Dehu : देहूमध्ये होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Dehu) यांच्या हस्ते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम 14 जून रोजी होणार असल्याची माहिती ‘ट्विटर’द्वारे आचार्य भाजप प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी दिली.

देहूगाव येथील देऊळवाड्यातील श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तिची विधीवत प्राण प्रतिष्ठापनाही करण्यात आलेली आहे. या संपुर्ण मंदिराचे पाषाणात बांधकाम करण्यात आले आहे.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या इच्छेप्रमाणे या मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. आणि त्यांना देहू येथे येण्यासाठी निमंत्रण दिले होते.

Bharati University : डॉ. एस. एफ. पाटील यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य प्रेरक

यावेळी आचार्य तुषार भोसले, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त भानूदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार असल्याने देहूमध्ये उत्साहाचे वातावरण (Dehu) निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.