Pune : श्री स्वामी समर्थ मठातर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – सांगली व कोल्हापूर या परिसरातील पूरग्रस्त बांधवांसाठी 49 मंगळवार पेठ  येथील ‘श्री स्वामी समर्थ’ गोगावले स्वामी मठ व भक्तांनी मदत पाठवली आहे. यात गहू, तांदूळ, तेल, साखर, शुद्ध पाण्याच्या बॉटल्स आणि कपडे आदी साहित्य पूरग्रस्तांना पाठविले आहे.

मठातील भक्तांनी स्वतःहून हे सर्व साहित्य सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अल्पावधीतच जमा केलेले आहे. या कार्यासाठी प्रताप गोगावले व अपर्णा गोगावले यांनी मार्गदर्शन केले आहे. “श्री स्वामी समर्थ” गोगावले स्वामी मठ, ४९ मंगळवार पुणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.