T20 WC: ग्रुप A च्या 12 व्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला पाच गडी राखत केले पराभूत

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : शारजा येथील आजच्या या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.बांगलादेश संघाने आपल्या निर्धारीत 20 षटकात चांगली फलंदाजी करताना चार गडी गमावून 171 धावा जमवल्या.


नाईम आणि रहीमच्या अर्धशतकी खेळीमुळे हे सन्मानजनक लक्ष त्यांना लंकेपुढे ठेवता आले खरे,पण लंकन संघाने सामनावीर असलंकाच्या धुवांधार नाबाद 80 धावामुळे आणि राजपक्षेच्या वेगवान 53 धावांच्या जोरावर हे मोठे लक्ष पाच गडी आणि 7 चेंडु राखत सहजपणे गाठत आपली विजयी सुरुवात केली आहे.

तर तमाम क्रिकेट जगताचे ज्या सामन्याकडे लक्ष लागून राहिले आहे त्या भारत पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघामधील सामन्यात पाकिस्तान कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली आहे.भारताकडून आजच्या सामन्यात कर्णधार कोहलीने अष्टपैलू हार्दीक पंड्यावर विश्वास ठेवत युवा ईशान किशनला संघाबाहेर ठेवले आहे,तर त्याचवेळी अनुभवी अश्विनऐवजी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिले आहे.

विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर नेहमीच वरचश्मा दाखवला आहे, आज तीच कामगिरी कोहलीची टीम करणार का, याची उत्सुकता संपूर्ण क्रिकेट जगताला लागून राहिलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.