Shrinagar News : भारत-पाकिस्तान सीमेवर आढळला नवीन बोगदा

एमपीसी न्यूज: भारतीय सीमा सुरक्षा दला च्या (Indian Border Security Force) जवानांना भारत-पाकिस्तान सीमेवर छूप्या मार्गाने तयार केलेला बोगदा ( Tunnel) शोधून काढण्यात यश आले आहे. जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पानसर भागात हा बोगदा आढळून आला आहे.

हा बोगदा 150 मीटर लांबीचा असून, 30 फूट खोल आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जून 2020 मध्ये याच भागातून शस्त्रात्रे आणि स्फोटके घेऊन जाणारे एक हेक्साकॉप्टर पाडले होते.

आज सापडलेला हा बोगदा मागील सहा महिन्यात सापडलेला सांबा, हिरानगर आणि कथुआ या भागातील चौथा बोगदा असून जम्मू भागातील दहावा बोगदा आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत पुढील तपास करत आहेत.

सीमा सुरक्षा दलाच्या ‘ॲटी टनलिंग ड्राईव्ह’ (Ati Tunneling Drive)  मोहिमेदरम्यान हा बोगदा आढळून आल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने दिली आहे. सुरक्षा जवानांनी 2019 मध्ये याच भागातील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.