Shrinath On Dhoni : महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटमधील योगी – जवागल श्रीनाथ

जवागल श्रीनाथ याने अश्विन सोबत लाईव्ह चॅट दरम्यान बोलताना हे वक्तव्य केले.

एमपीसी न्यूज – महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटमधील योगी आहे. त्याची खेळाची समज ही अप्रतिम आहे. तो निकालाची चिंता न करता खेळ समजून घेतो, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ याने याने व्यक्त केले आहे.

जवागल श्रीनाथ याने अश्विन सोबत लाईव्ह चॅट दरम्यान बोलताना हे वक्तव्य केले. श्रीनाथ म्हणाले, धोनी निरपेक्ष भावनेने खेळ खेळताना दिसतो. प्रत्येक विजयानंतर त्याची बोलण्याची पद्धत त्यांच्यातील साधेपणा अधोरेखित करते.

त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या स्पर्धांच्या ट्रॉफीसुद्धा तो इतर खेळाडूंच्या स्वाधीन करतो आणि स्वतः शांतपणे अलिप्त राहताना दिसतो.

_MPC_DIR_MPU_II

खेळपट्टीवर घडत असलेल्या बाबी आपल्या संघासाठी पोषक नसतील किंवा आपला संघ संकटात असेल तर तो हे दडपण हाताळतो, तसं एखादा योगीच करू शकतो.

अशा दाबावाच्या स्थितीतही तो खूप शांत आणि संयमी असतो हे त्याचे बलस्थान आहे, असेही श्रीनाथने सांगितलं.

मैदानाबाहेर आल्यानंतर तुम्ही जितक्या लवकर खेळापासून स्वत:ला दूर ठेवू शकता, तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं आणि फायद्याचं असतं. धोनी या बाबतीत सर्वोत्तम आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याच्याबद्दल नितांत आदर आहे, असं त्याने नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.