Maval : श्रीरंग बारणे यांना चिंचवड, पिंपरीतून सर्वाधिक मताधिक्य; बारणे यांचा 2,17,763 मताधिक्याने विजय

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तब्बल 2 लाख 17 हजार 763 मताधिक्याने विजयी झाले आहेत. बारणे यांना पाच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले.  पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघातून तब्बल 1 लाख 59 हजार 879 मताधिक्य त्यांना मिळाले. तर, राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांना केवळ कर्जत मतदारसंघातून 1850 मतांची आघाडी मिळाली. वंचित आघाडीचे राजाराम पाटील यांनी 75725 मते घेतली. नोटाला 15548 मते पडली आहेत. 
मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे 2 लाख 17 हजार 763 मोठे मताधिक्य घेत विजय मिळवला. पवार कुटुंबातील उमेदवार पार्थ यांचा पराभव केला. गेल्या 50 वर्षात पवार कुटुंबातील उमेदवाराचा पराभव झाला. मावळमधून 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदारापैकी 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी 2 हजार 504 केंद्रावरांवर मतदानाचा हक्क बजाविला होता. त्यापैकी 7 लाख 20 हजार 663 मतदान शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना मिळाले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना 5 लाख 4 हजार 750 मतदान मिळाले.
विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी!
*पनवेल*
श्रीरंग बारणे यांना  1 लाख 60 हजार 385
 पार्थ पवार यांना 1 लाख 5 हजार 727
बारणे आघाडी – 54 हजार 658
*कर्जत*
श्रीरंग बारणे – 83 हजार 996
पार्थ पवार – 85 हजार 846
पार्थ आघाडी – 1850
*उरण*
 श्रीरंग बारणे – 89 हजार 587
पार्थ पवार  – 86 हजार 699
बारणे आघाडी – 2888

*मावळ*
श्रीरंग बारणे – 1 लाख 5 हजार 272
पार्थ पवार – 83 हजार 445
बारणे आघाडी – 21 हजार 827
*चिंचवड*
श्रीरंग बारणे – 1 लाख 76 हजार 475
पार्थ पवार  – 79 हजार 717
बारणे आघाडी – 96 हजार 758
*पिंपरी*
श्रीरंग बारणे – 1 लाख 3 हजार 235
पार्थ पवार – 61 हजार 941
बारणे आघाडी – 41 हजार 294
पोस्टल मतदान – 3 हजार 357
श्रीरंग बारणे – 1 हजार 713
पार्थ पवार – 1 हजार 375
बारणे आघाडी – 338

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.