Shubman Gill : एकदिवसीय सामन्यात शुभमनने झळकवलं द्विशतक; सचिनचाही मोडला रेकॉर्ड

एमपीसी न्यूज : भारतीय संघाच्या युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले. हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात, गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा 5वा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि इशान किशन यांनीही भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा फखर जमान, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल यांनीही वनडेमध्ये 200 धावा केल्या आहेत.

145 चेंडूत द्विशतक पूर्ण केले – 

शुभमन गिलने 145 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. तो 149 चेंडूत 208 धावा करून बाद झाला. गिलने या खेळीत 9 चौकार आणि 19 षटकार मारले. भारतीय डावातील शेवटच्या षटकात तो बाद झाला. हेन्री शिपलीने त्याची विकेट घेतली. शुभमन गिल 48व्या षटकानंतर 182 धावा करून खेळत आहे. लॉकी फर्ग्युसनविरुद्ध लागोपाठ तीन षटकार ठोकून त्याने आपले द्विशतक पूर्ण केले.

Pune Police : पुणे पोलिसांनी उधळला खूनाचा कट; शस्त्रासह आरोपींना अटक

गिलने अनेक विक्रम मोडीत काढले – 

शुबमन गिल वनडेत द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण (Shubman Gill) खेळाडू ठरला आहे. त्याने ईशान किशनचा विक्रम मोडला. गेल्या महिन्यातच ईशानने बांगलादेशविरुद्ध 210 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षे 145 दिवस होते. गिलने 23 वर्षे 132 दिवसांच्या वयात द्विशतक झळकावले आहे. यासोबतच न्यूझीलंडविरुद्धची ही कोणत्याही फलंदाजाची सर्वात मोठी खेळी आहे. गिलने सचिन तेंडुलकरचा 186 धावांचा विक्रम मोडला. सचिनने 1999 मध्ये हैदराबादमध्येच हा पराक्रम केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.