PMPML : श्रावण महिन्यात भाविकांसाठी भीमाशंकर येथे रविवारी व सोमवारी पीएमपीएमएलची शटल सेवा

एमीपीसी न्यूज – श्रावण महिन्यात (PMPML) भीमाशंकर येथे भावकींची गर्दी होते व नागरिकांचीही गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलच्या वतीने दर रविवारी व सोमवारी भीमाशंकर येथे 24 तास शटल सेवा सुरु करण्यात आली आहे.

भीमाशंकर येथील पार्कींग ते भीमाशंकर मंदिर या मार्गावर पीएमपीएमएलच्या बसेस 24 तास धावणार आहेत. यासाठी निगडी डेपोतून 12 मिडी बस या भीमाशंकरला पाठविण्यात आल्या आहेत. या बसेस रविवारी पहाटे 4 वाजता निगडी येथून निघतील व सोमावारी उशीरा या बसेस निगडीला परत येतील. ऑगस्ट महिन्यातील 14, 15 व 16 या तारखांना लागून सुट्टी आल्याने या कालावधीत सोमवारी व मंगळवारी ही शटल सेवा सुरु राहणार आहे.

Snooker Tournament: स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा 2022 !

मिडी बसेससाठी लागणारे डिझेल भीमाशंकर येथेच सर्व्हिस व्हॅनमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करणेकामी ब्रेकडाउन व्हॅन देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.

तरी श्रावण महिन्यात प्रत्येक रविवार व सोमवारी भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएलच्या वतीने कऱण्यात (PMPML) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.