Alandi : सिद्धबेट कोणत्याही संस्थेला हस्तांतरण करत नाही – कैलास केंद्रे

एमपीसी न्यूज  – सिध्दबेट ही भूमी संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानेश्वर ,संत सोपानदेव ,संत मुक्ताबाई यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली तसेच पूर्वी(प्राचीन काळात) ऋषीमुनींनी केलेल्या तपाने पावन झालेल्या या पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक व भाविक येथे येत असतात.  संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर , संत सोपानदेव , संत मुक्ताबाई यांची लीलाभूमी, कर्मभूमी म्हणून हिची ओळख आहे. त्यामुळे आषाढी वारी व कार्तिकी यात्रेच्या वेळी बहुसंख्येने भाविक या भूमीच्या दर्शनासाठी येथे ही येत असतात.

Pune : ब्रह्मनाद कला मंडळ आयोजित 22व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा समारोप

महाराष्ट्र शासन नियोजन विभाग श्री क्षेत्र देहू , आळंदी, पंढरपूर , भंडारा डोंगर , पालखी तळ/ मार्ग विकास आराखड्या मार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून आळंदी (Alandi) येथील सिध्दबेट विकास करण्यात आला. सिद्धबेटामध्ये चालण्यासाठी दगडी वॉकिंग ट्रॅक , इंद्रायणी नदी काठी संरक्षक भिंती तसेच त्या जागेला कंपाउंड च्या भिंती उभारण्यात आल्या आहेत.

मध्यंतरी काही समाज कंटकाद्वारे प्रवेशद्वार जवळच असणाऱ्या भिंतीला खालील बाजूस भगदाड पाडत त्या भागात सांडपाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे ते सांडपाणी पूर्णपणे तेथील काही भागातील दगडी ट्रॅक वर येत होते.याची प्रशासनाने दखल घेत तेथील त्या सांडपाणीची ड्रीनेज पाईप लाईन द्वारे व्यवस्था करण्यात आली.तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला.

सिध्दबेट या ठिकाणी सद्यस्थितीत एक बाजू वगळता चालण्याकरिता दगडी ट्रॅक अस्तित्वात आहे. पावसाळ्यात या एका बाजूने दरवर्षी चिखल होऊन चालण्यास नागरिकांना अडचण होते. ही बाब लक्षात घेवून नगरपरिषदेच्या पुढाकारातून आयएएचव्ही( IAHV) या संस्थेने त्यांच्या सीएसआर (CSR ) निधीतून दगडी वॉकिंग ट्रॅकसाठी मदत करण्यास सहमती दर्शवली.त्या विकास कामाचे भूमिपूजन आज दि.29 रोजी मुख्याधिकारी कैलास केंद्रे,कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, शहर अभियंता संजय गिरमे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भिंतीवर चित्रे, सुशोभीकरण, गेट, भाविकांसाठी बैठक व्यवस्था, नियोजन बद्ध वृक्षारोपण,सांडपाणी व्यवस्था, पूरपरिस्थिती लक्षात घेत नियोजन बद्ध विकास कामे ,प्रवेशद्वार जवळील जुन्या बांधकामाचे नूतनीकरण, कंपाउंड च्या भिंतींना ठीक ठिकाणी जी समाजकंटकांद्वारे भगदाडे पाडली गेली त्याची दुरुस्ती त्यामुळे कचरा टाकणे,कचरा जाळणे व इतर गैरप्रकारांना आळा बसेल व विविध नियोजन बद्ध विकास कामांचे नियोजन आहे. मुख्याधिकारी यांनी यावेळी याबाबत माहिती दिली. तसेच ती विकास कामे करत असताना सिध्दबेट कोणत्या ही संस्थेला हस्तांतरण करत नाही. यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी येथील परिस्थिती, दुरवस्था पाहता त्यांनी सिध्दबेटात प्रथमतः पालिके मार्फत सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. सिध्दबेट मधील स्वच्छतेला प्राधान्य देत तेथील विकास कामांना सुरवात केली.

आळंदी (Alandi) येथील सिध्दबेट जवळील जुन्या बंधाऱ्या वरील लोखंडी पाईप लाईन वरून एक मद्यपी व्यक्ती तेथून चालत जात असताना त्याचा तोल जाऊन खाली पडून जुन्या बंधाऱ्या मधील (मोरी) दरवाजाच्या समोरील ठिकाणी अडकला होता.

सिध्दबेट येथील पालिकेतील सुरक्षारक्षक मारुती सोळंके यांनी ती घटना पहाताच तत्काळ तिथे त्यांनी धाव घेतली होती. मारुती सोळंके व दिग्विजय तौर यांनी त्या व्यक्तीस तेथून सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.

याबद्दल सुरक्षारक्षक मारुती सोळंके याचा यावेळी श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुप्रिया पाटील, कृष्णा काळदाते, संतोष धुमाळ, डी डी भोसले,  प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, सागर भोसले, शिरीष कारेकर, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, डॉ.सुनील वाघमारे, किरण नरके , अरुण बडगुजर , कर्मचारी अजय देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.