Alandi : सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे. तपोवन सारख्या संस्थेस देऊ नये – मनसे,रिपब्लिकन सेना,

आळंदी जनहित फौंडेशनची मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन सेना व आळंदी (Alandi) जनहित फौंडेशन यांच्या वतीने दि.26 रोजी तहसीलदार (खेड),प्रांत आधिकारी (खेड ) यांना सिध्दबेट हे सिद्धबेट रहावे ते तपोवन सारख्या संस्थेस न देण्याबाबतचे निवेदन संबंधित कार्यालयात देण्यात आले.

Pimpri : कष्टकरी महिलांवरील अन्याय थांबवा; कष्टकरी संघर्ष महासंघाची महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी

तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये स्थान महात्म्य जोपासण्यास तसेच पावित्र्य राखण्यास सेवाभावी संस्थासह आळंदी नगरपरिषद यांनी कामकाज सुरू केले आहे. आळंदी हद्दीतील आळंदी सिध्दबेट हे सिध्दबेट राहावे अशी मागणी आहे. यासाठी आळंदी नगरपरिषदकडेच ते राहावे.

आळंदी (Alandi) नगरपरिषदेकडे देखभाल दुरुस्ती आणि विकास कामासाठी सुपूर्द करण्यात यावे. तशी आळंदी नगरपरिषदेची ही मागणी आहे. यासाठी नगरपरिषदेने ठराव देखील केला आहे. ते आळंदी नगरपरिषदेकडे राहणे आवश्यक आहे.अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

आळंदी नगरपरिषद आणि विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, यांनी प्रयत्न पूर्वक वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन , स्वच्छता करण्याचे सामाजीक बांधीलकीतून काम सुरू झाले आहे. यास अधिक गती देखील येत आहे. यामुळे सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे यासाठी स्थानिक नागरिक , सेवाभावी संस्था यांचे माध्यमातून यापूर्वी केलेल्या प्रयत्नास यश येऊन आळंदीतून एक संस्था हद्दपार करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते.

आळंदी (Alandi) नगरपरिषद हद्दीत आळंदी सिध्दबेट असल्याने आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडे सदर आळंदी सिध्दबेट विकास साधण्यासाठी , देखभाल दुरुस्ती करण्यास सुपूर्द करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी पूर्वीच आळंदी सिध्दबेटात सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण, संवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता कार्य झाले आहे. नागरिकांचा येथे प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. भाविक, नागरिक आळंदी सिध्दबेटास भेट देत आहेत. तपोवन सारख्या संस्थेला येथील जागा देण्याचा विषय एकला असून आळंदी सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे.

यासाठी ते आळंदी नगरपरिषदेकडे रहावे. अशी मागणीमनसे, रिपब्लिकन सेना, स्थानिक आळंदीकर नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.  रिपब्लिकन सेनेचे निवेदन संदीप रंधवे व आळंदी जनहित फौंडेशनचे अर्जुन मेदनकर यांनी निवेदन दिले. मनसेचे निवेदन किरण नरके, सहदेव गोरे, परमेश्वर बडबडे, मयूर पेडकर यांच्या वतीने देण्यात आले. तसेच ते निवेदन आळंदी नगरपरिषदेस ही देण्यात आले. पालिका कार्यालयीन अधीक्षक किशोर यावेळी उपस्थित होते. चला एक पाऊल सिध्दबेटाकडे या अभियानात अंतर्गत विठ्ठल शिंदे व विलास काटे यांचे कार्य ही सद्यस्थितीत चालू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.