Pimpri : पाकडवा विवाह प्रथेवर परिणिती चोपडा व सिद्धार्थ मल्होत्रा यांचा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – अभिनेत्री परिणीती चोपडा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाला भेट दिली. यावेळी दोघांनीही बिहारमधील पाकडवा विवाह प्रथेवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

यावेळी जबरिया जोडी अर्थात परिणीती व सिद्धार्थ डॉ. डी. वाय पाटील दंत महाविद्यालयात येताच विद्यार्थ्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही. टाळया, शिट्ट्याच्या मोठ्या आवाजात त्यांचे तरुणाईने स्वागत केले. सिद्धार्थ म्हणाला की, बिहारमधील प्रचलित वरांचे (पाकडवा विवाह) अपहरण करण्याच्या प्रथेवर जबरिया जोडी आधारित आहे.

‘जबरिया जोडी’ च्या गाण्यावर दोघांनी नृत्य केले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थिती होती. या चित्रपटाच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सुद्धा नृत्य सादर केले. सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. येत्या ९ ऑगस्ट रोजी ‘जबरिया जोडी’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  हा चित्रपट सर्वांनी पाहावा यासाठी अभिनेत्री परिणीती चोपडा यांनी सर्वांना आवाहन केले.

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कोषाध्यक्ष व ट्रस्टी डॉ. यशराज पाटील व पत्नी यशश्री पाटील यांनी अभिनेत्री परिणीती चोपडा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचे स्वागत केले व त्यांच्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.