Pune : पदयात्रा, प्रचारफे-या, मतदारांच्या भेटीगाठी घेत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सुरु

किरीट सोमय्या आणि गिरीश बापट यांनीही सदिच्छा भेट देत केल्या कार्यकर्त्यांना सूचना

एमपीसी न्यूज – संगणकाच्या स्मार्ट युगातही पदयात्रा काढत समाजाच्या प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे पारंपारिक प्रचारावर भर देत आहेत. गेल्या आठ दिवसात शिवाजीनगर मतदार संघातील विविध ठिकाणी पदयात्रा, प्रचारफे-या, मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांचा प्रचार सुरू आहे. याबरोबरच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयात नुकतीच सदिच्छा भेट देत प्रचारयंत्रणेचा आढावा घेत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.    

आज सकाळी देखील भांडारकर रस्ता परिसरातील दत्त मंदिर, कमला नेहरू पार्क, हिरवाई वॉकिंग ट्रॅक बरोबरच डेक्कन जिमखाना हौसिंग सोसायटीमध्ये सुद्धा शिरोळे यांनी भेट दिली. नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन शुभ आशीर्वाद घेतले, चर्चा केली व त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नाना मोरे, गणेश बगाडे, जीतू मंडोरा, दत्ता खंडागळे, प्रवीण शेळके, बाबा शिरोळे, निलेश घोडके, मिलिंद टकले आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर येरवडा येथील जय जवान नगर या ठिकाणी देखील प्रचारफेरी पार पडली. या वेळी नगरसेविका श्वेता चव्हाण, शंकर चव्हाण, केतन पवार, अंकुश राठोड, विक्रम राठोड, दीपक चव्हाण, राहुल राठोर, करण पवार, किरण चव्हाण, मोहित काकडे, निखील रणनवरे उपस्थित होते.

या अगोदर काल सायंकाळी औंध आयटी पार्क जवळील शांतिनिकेतन या सोसायटीला देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी भेट दिली. सोसायटी सदस्यांबरोबर विविध बाबींवर या वेळी सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या अपेक्षाही त्यांनी समजून घेतल्या. यावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे आणि माजी नगरसेवक आनंद छाजेड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like