Santosh Jadhav Arrested :सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण; संशयित शार्प शूटर संतोष जाधव पुणे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येनंतर गुन्हेगारांना शोधण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या पुण्याचा शार्प शूटर संतोष जाधव (Santosh Jadhav Arrested) याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. संतोष याला पुणे पोलिसांनी आज उशीरा गुजरात येथून अटक केली असून यापूर्वी त्याचाच साथीदार सिद्धार्श कांबळे (सौरभ महाकाल) याला पुण्यातील नारायणगाव येथून अटक करण्यात आली आहे. 

सिद्धू मुसेवाला यांच्यावर आठ जणांनी हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. त्यातील दोघे हे पुण्यातील असल्याचे निदर्शनास आल्याने पुणे पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम सुरू केली होती. काही दिवसांतच नारायणगाव येथून सिद्धार्श कांबळे याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या चौकशीअंती तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.

Todays Horoscope 13 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

कित्येक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रडारवर असणारा आणि सिद्धू मुसेवाला हत्येतील शार्प शूटर संतोष जाधव (Santosh Jadhav Arrested) याला पुणे पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आणि रात्री उशीरा न्यायालयात दाखल केले. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणी अधिक तपासासाठी 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी संबंधित माहितीला दुजोरा दिला असून अधिक माहिती सोमवारी सकाळी देण्यात येईल असे सांगितले आहे.

 कोण आहे संतोष जाधव?

संतोष जाधव हा आंबेगाव येथील पोखरी गावचा रहिवासी आहे. संतोष जाधव याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले याच्या खून प्रकरणी मोक्का कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी काही महिन्यांपासून पुणे ग्रामिण पोलिस त्याच्या मागावरच होते. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आला होता आणि यामध्ये संतोष जाधव याचे नाव समोर आले होते. यापूर्वी त्याच्यावर चोरीचा गुन्हा सुद्धा दाखल होता. दरम्यान, मोक्का लावल्यानंतर पुणे ग्रामिण पोलिस अनेक दिवस संतोष जाधव या्च्या मागावर होते. त्यासाठी त्याचा गुजरात, राजस्थान या ठिकाणी शोध घेतला जात असताना बिष्णोई टोळीत सहभागी झाल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. परंतु मुसेवाला हत्याप्रकरणानंतर संतोष जाधवला अटक करण्यासाठी वेगाने चक्रे फिरू लागली. अखेर पुणे पोलिसांना गुजरात येथून संतोष जाधव याच्या मुसक्या आवळण्यास यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.