-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune: सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने 18 लाखांचा गंडा

sim swapping in pune Man lost Rs 18 lakhs to fraudster

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने कोथरुड येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला तब्बल 18 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन कुलकर्णी (रा. कोथरुड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी कोथरुड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

सचिन कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. दि. 6 मे रोजी कुलकर्णी यांना मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्या व्यक्तीने त्यांना सीमकार्ड अपडेट करणार असल्याचे म्हटले.

त्यानंतर नवीन सीमकार्ड क्रमांक मोबाइल कंपनीला पाठवावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार कुलकर्णी यांनी संबंधित संदेश त्या व्यक्तीला पाठवला. त्यानंतर अज्ञात चोरट्याने नवीन सीमकार्डचा गैरवापर करत कुलकर्णी यांच्या बँक खात्यातील 1 लाख 80 हजार 148 रुपये काढले.

सचिन कुलकर्णी यांचे डेक्कन जिमखाना भागातील भांडारकर रस्त्यावरील एका बँकेत खाते आहे. चोरटय़ाने कुलकर्णी यांच्या बँकेत संपर्क साधला. कुलकर्णीच्या नावाने त्याने बँकेकडे 16 लाख 45 हजार 352 रुपयांचे वैयक्तिक कर्ज मागितले.

ऑनलाइन पद्धतीने हे कर्ज मंजूर झाल्यानंतर चोरटय़ाने कर्जापोटी मिळालेली रक्कम स्वत:च्या खात्यात जमा केली. चोरटय़ाने एकूण 18 लाख 25 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.

माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.