Pune: काही प्रमाणात गणेश मूर्ती बाहेर विसर्जन होणार असल्याने नियोजन करा : दीपाली धुमाळ

Since some of the Ganesh idols will be immersed outside, do planning for it- Deepali Dhumal.

एमपीसी न्यूज – श्री. गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करणेबाबत नियोजन आहे. त्याबाबतचे आवाहन आपण करुच. परंतु, काही प्रमाणात श्री. गणेश मूर्ती या बाहेर विसर्जन करण्याची शक्यता असल्याने त्याबाबतचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.

या संपूर्ण विषयाबाबत पुणेकरांमध्ये संभ्रमता असून प्रशासनाची या विषयी असलेली स्पष्ट भूमिका तातडीने जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दि.२८/७/२०२० रोजी महापौरांना  श्री. गणेश मूर्ती उपलब्धता, विर्सजन, श्री. गणेश मूर्ती विक्री स्टॉल परवानगी प्रक्रियेबाबत सर्व पक्षीय गटनेत्यांनी लेखी पत्र दिले आहे. मात्र, अद्यापही  याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

पुणे शहरात मागील वर्षाची अतिवृष्टी त्याच पाठोपाठ कोरोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवसायांसोबतच गणेश मूर्तीकार यांच्या देखील उत्पन्नावर गदा आलेली आहे.

दरवर्षी पुणे शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पुणे महानगरपालिकेकडून गणेश मूर्ती विक्रिचे स्टॅाल उभारण्यास परवानगी दिली जाते. नागरीकांना नजिकच्या  ठिकाणी श्री. गणेश मूर्ती उपलब्ध होईल, आशा प्रकारे कार्यवाही करावी.

विसर्जन घाट, विसर्जन हौद यांची उपलब्धता केली जाावी,  या वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर श्री. गणेश मूर्ती विसर्जनाबाबतचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.