Chinchwad News : सिंधी प्रीमियर लीग 16 मार्चपासून ; 14 संघांचा सहभाग

एमपीसी न्यूज – सिंधी प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम येत्या 16 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी लीगमध्ये 14 संघानी सहभाग घेतला असून,  पिंपरीतील एमसीसी मृणाल किकेट मौदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण सिंधी प्रीमियर लीगच्या फेसबुक पेजवरून केलं जाणार आहे. अशी माहिती कन्वल खियानी व हितेश दादलाणी यांनी रविवारी (दि. 08) पत्रकार परिषदेत दिली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी, पियुष जेठानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते. खियानी म्हणाले, सिंधी प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम 16 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान रंगणार आहे. सिंधी समाज फक्त व्यावसायापुरता आहे हा समाज खोडून काढण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेला व्यापक स्परूप आले असून, पुणे, परभणी व नांदेड मधील खेळाडू सहभागी झाले आहेत.

आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केलं. स्पर्धेत 14 संघ असून 220 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. संघ विकत घेतलेल्या मालकांकडून 25 लाख आभासी (व्हर्चुअल) चलनातून या खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.