Kalewadi : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा 41वा वार्षिक स्नेहमेळावा काळेवाडी येथील जोतिबा मंगल कार्यालय येथे  उत्साहात पार पडला.
 नगरसेविका उषा  काळे यांच्या हस्ते या स्नेहमेळाव्याचे  उदघाटन करण्यात आले.   या वेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अंकुशराव साईल, प्रमोद राणे, परशुराम प्रभू, अरविंद पालव आदी उपस्थित होते.

यानंतर कोकण सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पुढे मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. परीक्षक म्हणून शोभा गायकवाड, मेघा साईल यांनी काम पाहिले. नाट्यसिंधूच्या वतीने प्लॅस्टिकबंदीबाबत समाज प्रबोधनपर एकांकीका सादर करण्यात आली. ‘शिक्षणाचा सोपा मार्ग’ या विषयावर वक्ते सदाशिव पांचाळ यांचे व्याख्यान झाले.
यानंतर स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यासोबत कोकण महासंघाचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम, शिवसेना जिल्हा संघटीका सुशिला पवार, माजी नगरसेविका विजया सुतार, प्रमोद ताम्हणकर, उद्योजक संतोष सुतार, अविनाश चाळके यांच्या हस्ते जिल्हा अंतर्गत दिला जाणारा ‘सिंधुदुर्ग जिल्हा भुषण पुरस्कार’ कोकण कन्या रिना व वर्षा विश्वास केसरकर या दोन उच्चशिक्षित तरुणींना देण्यात आला. या दोघी बहिणींनी वडिलांच्या आजारपणानंतर पुरुषांनाही लाजवेल अशी शेती करुन तरुणांपुढे एक आदर्श घडविला.
तसेच मंडळांतर्गत दिला जाणारा पुरस्कार चंद्रकांत नाईक यांना देण्यात आला. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार, मानपत्र, शॉल, श्रीफळ असे होते. त्याचप्रमाणे पाच ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत चव्हाण, गणपत सावंत, शरद कवठणकर, भास्कर प्रभू, मधुसुदन परब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.