Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे गायन स्पर्धा   

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडी पुणेतर्फे एक  गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची चाचणी फेरी दि. 29 आणि 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघनी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वयोगट मर्यादा असून ही स्पर्धा 17 ते 40 वयोगट हौशी कलाकारांना भाग घेता येणार आहे.  त्यासाठी 27 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत http://rcnigdisingingsuperstar.com या लिंकद्वारे 500 रुपये नोंदणी फी आणि फॉर्म भरुन भाग घेता येईल. या स्पर्धेची चाचणी फेरी दिनांक 29 आणि 30 सप्टेंबरला आकुर्डी येथे पॅन्टालूमच्या वर सिझन्स बॅनक्वे येथे होणार असून उपांत्य व अंतिम फेरी ऑक्टोबर 6 व 7 या तारखांना घेण्यात येईल.

प्रथम पुरस्कार ट्रॉफी,  25000/- आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार  15000/- आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार  10000/- आणि प्रशस्तीपत्रक, शेवटच्या 4 क्रमांकानाही प्रत्येकी 2500/- आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येतील.

या स्पर्धेसाठी गायन आणि संगीत क्षेत्रातील कलाकार परीक्षक म्हणून काम करणार आहेत. गायन कलेला प्रोत्साहन आणि रोटरी मार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची सर्वांना ओळख व्हावी या दृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.