Chinchwad Crime News: बनावट कागदपत्रांद्वारे एकच फ्लॅट ठेवला अनेकांकडे गहाण

Single flat mortgaged to many by forged documents.

एमपीसी न्यूज – एका बॅंकेकडे फ्लॅट गहाण असताना बनावट कागदपत्र सादर करून त्याच फ्लॅटवर आठ बॅंकाकडून कर्ज मंजूर करून घेतले. याप्रकरणी एका बॅंकेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 25 मार्च 2013 ते 7 जून 2021 या कालावधीत महानगर को. ऑप. बॅंकेच्या तळवडे शाखेत घडली.

विजय आप्पासाहेब सुतार आणि त्याची पत्नी (सध्याचा पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दांपत्याचे नाव आहे. संजय महादेव वरखडे (वय 34, रा. खराडी, पुणे) यांनी सोमवारी (दि. 7) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय याच्या पत्नीने तिच्या मालकीच्या मे. विजयराज फोम इंडस्ट्रीज करिता महानगर बॅंकेकडे 50 लाखांच्या कर्जाची मागणी केली. आरोपी दांपत्याच्या नावावर असलेला केशवनगर, चिंचवड येथील श्री मोरया गोसावी राज पार्क फेज-2 मधील ए विंगमधील पाचव्या मजल्यावर असलेला फ्लॅट क्रमांक 19 हा फ्लॅट गहाणखत म्हणून बॅंकेकडे ठेवला.

आरोपींनी या फ्लॅटवर पूर्वी युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या कासारवाडी शाखेतून कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते थकलेले असतानाही आरोपी दांपत्याने युनियन बॅंकेचे कर्ज फेडल्याचे बनावट ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र महानगर बॅंकेला सादर करीत 50 लाखांचे कर्ज पुन्हा नव्याने मंजूर करून घेतले.

आरोपींनी अशाच प्रकारे सदरचा फ्लॅट आठ व्यक्‍ती अथवा बॅंकेकडे तारण ठेवून त्या बॅकांकडूनही कर्ज मंजूर करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.