Pimpri : ‘रेल्वे ट्रॅक’वर पाणी साचल्याने सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस शनिवारी, रविवारी रद्द

एमपीसी न्यूज – मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात पाऊस चालू असून रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे.  त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून पुण्याकडे धावणा-या सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस गाड्या उद्या (शनिवारी) आणि परवा (रविवारी) रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे ते पनवेल पॅसेंजर देखील दोन दिवस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झव्हंर यांनी दिली.  

_MPC_DIR_MPU_II

मुंबई शहर आणि उपनगरात आज शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे धावणा-या आणि मुंबईहून पुण्याकडे येणा-या सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्या शनिवारी, रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणा-या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

अनेकांना कामांचे नियोजन रद्द करावे लागणार असून नोकरीवर जाता येणार नाही. सिंहगड एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांमधून दररोज प्रवास करणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, अचानक या दोन्ही गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर पुणे ते पनवेल पॅसेंजर देखील दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय भुसावळला जाणारी रेल्वे कल्याणऐवजी दौंड मार्गे जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.