Sinhagad Express News : सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवरून महिलांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज – कोरोना साथरोगानंतर सिंहगड एक्सप्रेसमधील (Sinhagad Express News) काही डब्बे कमी करण्यात आले. यामुळे मुंबई – पुणे दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत आहे. गुरुवारी (दि. 6) सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेच्या कारणावरून महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये मारहाणीच्या घटना वारंवार घडतात. गुरुवारी महिला बोगीमध्ये जागेच्या कारणावरून महिलांमध्ये हाणामारी झाली. प्रवाशांनी सिंहगड एक्सप्रेसबाबत असलेल्या अडचणींबाबत रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी सांगून देखील प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सिंहगड एक्सप्रेसमधील महिला बोगीमधून अनेकदा पुरुष प्रवासी देखील प्रवास करतात. सिंहगड एक्सप्रेसच्या जनरल बोगी आणि महिलांची पास बोगी कमी केल्यामुळे एकाच बोगीत कोंडी होत आहे. प्रसंगी मोठे वाद होतात. सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पास बोगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Pimpri News : इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या कामासाठी 25 झोपड्यांचे स्थलांतर करणार

झालेल्या मारहाणी बाबत महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अनेक प्रवासी जवळच्या अंतरासाठी देखील सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करतात. त्यांना पासधारक (Sinhagad Express News) महिलांनी विचारणा केली असता स्थानिक महिलांनी पासधारक महिलांना मारहाण केली. हा प्रकार बोगी क्रमांक डी 12 मध्ये घडला. पासधारक महिलांसाठी स्वतंत्र बोगी द्यावी. बोगीमध्ये नियमितपणे तिकीट तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी म्हणाले, सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिला पासधारकांसाठी स्वतंत्र डबा असावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. पासधारक प्रवाशांसाठी असलेल्या डब्यात काही अडचणी आल्या तर ते प्रवासी आपसात सामंजस्याने त्या सोडवतात. मारहाणीचे प्रसंगही यामुळे कमी होतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.