Pune :- सिंहगड रस्त्यावरील ‘त्या’ तरुणाची हत्या 31 डिसेंबरला झालेल्या पार्टीच्या वादातून

एमपीसी न्यूज -सिंहगड रस्त्यावरील फनटाइम चित्रपटग्रहजवळ आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रोहन साळवी (वय 27) या तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निघृण खून करण्यात आला.

सिंहगड पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी निष्पन्न झाले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री दारू पिताना झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री रोहन मित्रांसोबत दारू पीत बसला होता. यावेळी त्याला एकाचा पाय लागला. यातून झालेल्या भांडणातून रोहनने दाद्या ऊर्फ रोहित मोरे याचा शर्ट फाडला होता. हाच राग मनात धरून दाद्या ऊर्फ रोहित मोरे आणि त्याच्या तीन मित्रांनी रोहनची हत्या केली.

आरोपींनी रोहन याला अतिशय निघृनपणे मारले. चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याचा चेहरा विद्रुप केला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. सर्व हल्लेखोरांची ओळख पोलिसांनी पटली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.