chinchwad : भावी पिढीसाठी अंतरिक्ष संशोधनातील संधींबाबत सिन्हा यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन

चांद्रयान २ मोहिमेविषयी सायन्स पार्क येथे विशेष व्याख्यान

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट आयोजित चांद्रयान 2 मोहिमेविषयी विशेष व्याख्यानात इस्रोचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक यांनी विद्यार्थी व पालकांना भविष्यातील अंतरिक्ष संशोधनातील भावी पिढीसाठी संधी याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे चांद्रयान 2 मोहिमेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन सायन्स पार्कचे प्रमुख प्रवीण तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संघाचे समन्वयक आर. आर. मिश्रा, अभिजित शिक्षण सोसायटीचे आर. बी. पाटील, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क प्रशासक अधिकारी अस्मिता सावंत, दत्ता लोणकर, अनिल दराडे, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षण अधिकारी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचे नंदकुमार कासारकर यांनी केले. तर आभार सहाय्यक शिक्षण अधिकारी सुनील पोटे यांनी केले.

भारतीय बनावटीचे चांद्रयान 2 विक्रम लॅण्डर शनिवारी पहाटे १. ५५  च्या दरम्यान यथावकाश उतरण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. इस्रो प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांत्वन करत ” विज्ञानात प्रयोग असतात अपयश नाही ” असे इस्रो व भारतीयांना संबोधित केले, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

सिन्हा यांनी चांद्रयान २ बद्दल त्यांनी ते प्रेक्षेपित करण्यापासून ते आज पहाटे संपर्क तुटण्यापर्यँत सविस्तर माहिती दिली. तसेच विज्ञानाबद्दल समाजात जनजागृती कशी  करावी, वेगवेगळ्या यानाची माहिती, अंतरिक्ष क्षेत्रात पुढील पिढीला काय संधी आहेत. याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच चांद्रयान २ ची प्रतिकृती ही प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.