Sinhgad E-Bus : सिंहगड किल्ल्यावर ई-बसचा अपघात टळला; एका भिंतीने वाचले 40 प्रवाशांचे प्राण

एमपीसी न्यूज : सिंहगड किल्ल्यावर (Sinhgad E-Bus) पुणे परिवहन मंडळाच्या बसचा मोठा अपघात टळला. सुदैवाने  ई-बसमध्ये बसलेले 40 प्रवासी एका भिंतीमुळे बचावले. ही घटना आज दुपारी 12.30 च्या सुमारास सिंहगड किल्ल्यावरून बस खाली उतरत असताना घडली. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते.

आज (13 मे) सिंहगड किल्ल्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (PMPML) ई-बस प्रवासी घेऊन किल्ला उतरत असताना पहिल्याच वळणात घसरली. आणि भिंतीला जाऊन आदळली. ज्या भिंतीला ही बस आदळली त्या पाठी खोल दरी होती. परंतु, भिंतीला जाऊन आदळल्याने सुदैवाने सर्व 40 प्रवासी बचावले.

Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर सापडलेला बॉम्ब नव्हे तर फटाक्याच्या पुंगळ्या

किल्ला परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वनविभाग आणि पीएमपीएमएलने ‘माझा सिंहगड, माझा अभिमान’ या मोहिमेअंतर्गत १ मे पासून सिंहगड किल्ल्याच्या (Sinhgad E-Bus ) पायथ्यापासून शिखरापर्यंत बससेवा सुरू केली आहे. तसेच, सुट्ट्यांचा काळ पाहता गर्दी टाळण्यासाठी पीएमपीएमएलने वीकेंडला सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी बसची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या मार्गावर वीकेंडला २४ बसेस धावणार आहेत. अलीकडे गडावर प्रवाशांचा ओव्हरलोड झाल्यामुळे बसच्या अपघाताची शक्यता वाढल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.