Sinhgad Road : ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; वाईन शॉप मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पैसे घेऊनही ग्राहकाला मद्य देण्यास नकार (Sinhgad Road ) दिला. त्यानंतर ग्राहकाने पैसे परत मागितल्याने त्याला लाथा बुक्क्यांनी, लाकडी बांबूने आणि स्टीलच्या झाकणाने मारहाण केली. सिंहगड रस्ता परिसरातील जेम्स वाईन हिंगणे खुर्द येथे 30 मे च्या रात्री हा प्रकार घडला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाईन शॉप चा मालक चंदन म्हात्रे कामगार पप्पू पुणे याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भीमराज दहिवळ (वय 47) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune : रूम खाली करा म्हणताच भाडेकरुंनी घर मालकाला बदडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंदन मात्रे हा जेम्स वाईन या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करतो. फिर्यादी हे 30 मे च्या रात्री सात वाजण्याच्या सुमारास या वाईन शॉप मध्ये कॉटर घेण्यासाठी गेले होते. फिर्यादी यांनी गुगल पे द्वारे 280 रुपये देऊन कॉटर देण्याची मागणी केली. मात्र आरोपींनी कॉटर न देता (Sinhgad Road ) फिर्यादीचे पैसेही परत केले नाहीत. फिर्यादीने पैसे मागितले असता त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.