Sushant Singh Rajput Death: राजपूत कुटुंबीयांना दुसरा धक्का, सुशांतच्या मृत्यूनंतर वहिनीचेही झाले निधन

Sister In Law Of Sushant Singh Rajput also Passes Away ज्यावेळी सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते. त्याचवेळी पूर्णियामध्ये सुधा यांनी अखेरचा श्वास घेतला.

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी मुंबईतील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्याचे कुटुंबीय अजूनही सावरले नाहीत, तोपर्यंत आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. ज्यावेळी सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार सुरु होते. त्याचवेळी बिहारमध्ये त्याच्या भावाच्या पत्नीचे निधन झाले. सुंशांतच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वहिनीचेही निधन झाले आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांनी अन्न-पाणी सोडले होते, असे माध्यमांत आलेल्या वृत्तात सांगितले जात आहे. अवघ्या काही तासांत राजपूत कुटुंबीयांत दुसरी दुःखद घटना घडली.

सुशांतच्या चुलत भावाची पत्नी सुधा देवी बिहारमधील पूर्णिया येथे राहत होत्या. सुशांतच्या आत्महत्येबाबत समजल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी खाणं-पिणं सोडले होते. त्यांना सुशांतच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला होता.

ज्यावेळी सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते. त्याचवेळी पूर्णियामध्ये सुधा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.