Hinjawadi News : दारू प्यायल्याचे आईला सांगितल्याच्या संशयावरून मावस बहिणीला रॉडने बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – मावस भाऊ दारू प्यायल्याचे बहिणीने त्याच्या आईला सांगितले. या संशयावरून मावस भावाने बहिणीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) हिंजवडी येथे घडली.

मनीषा हिरामण चव्हाण (वय 32, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, हिंजवडी) असे मारहाण झालेल्या बहिणीचे नाव आहे. त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर महिंद्र मोरे (वय 24, रा. मारुंजी, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर आणि फिर्यादी मनीषा हे मावस भाऊ बहीण आहेत. सागर दारू पिल्याचे फिर्यादी यांनी त्याच्या आईला सांगितले असल्याचा संशय सागर याला होता. त्यावरून सागर याने लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांच्या घरात जाऊन त्यांना बेदम मारहाण केली.

यामध्ये फिर्यादी यांच्या उजव्या हातावर, पाठीच्या डाव्या बाजूला, कमरेवर डाव्या बाजूला दुखापत झाली. तसेच आरोपी सागर याने तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी सागर याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.