BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : राखी खरेदीसाठी बहिणींची लगबग

विविध प्रकारच्या राखींनी शहरातील बाजारपेठ फुलल्या

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – रक्षा बंधनाच्या सणाचे आगमन येत्या गुरुवारी होत असून आपल्या लाडक्या भावाला राखी देण्यासाठी तमाम बहिणी वर्गाकडून राखी खरेदीसाठी लगबग सुरु आहे.

तळेगाव शहरातील बाजार पेठेत अनेक स्टेशनरी, किराणा तसेच इतरांनी आपली किरकोळ विक्रीसाठी राखीची दुकाने  थाटली आहेत. राखी विक्रीच्या दुकानामध्ये ५ रुपयापासून शंभर रुपये पर्यंतची राखी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. राखीमध्ये साध्या गोंड्यापासून आकर्षक अशा सिनेतारकांच्या फोटोचे, कार्टून, लायटिंगच्या विविध प्रकारच्या राख्या विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. तर ब्रेसलेटही राखीच्या स्वरुपात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. संपूर्ण बाजार पेठेत राखी विक्रीची अनेक दुकाने लागली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.