Pune Crime News : प्रेमप्रकरणातून बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या रागातून एका तरुणाने बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली जुन्नर तालुक्यात 28 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी करण शिवाजी वाळुंज (वय 20) यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी अरुण मडके, यश डावखर व जिजाराम या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणाच्या चुलत भावाचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली होती. त्यामुळे 28 डिसेंबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ आणि इतर नातेवाईक या तरुणाला जाब विचारण्यासाठी गावात जमले होते. यावरून त्यांच्यात वादावादी झाली आणि तिन्ही आरोपींनी फिर्यादीच्या भावाला लाकडी काठी आणि हातांनी बेदम मारहाण केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.