Pune News : पतीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून बहिणीच्या तीन वर्षीय मुलाचा पाण्यात बुडवून खून

एमपीसी न्यूज : स्वतःच्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेला बहिणीच्या तीन वर्षीय मुलाला पाण्यात टाकून देत त्याचा खून केला. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बांधकाम साइटवर 1 मे रोजी हा प्रकार घडल.

या अवधेश धनीराम वर्मा (वय 27, युनी वास्तू इंडिया कंपनी, लेबर कॅम्प, मार्केट यार्ड गेट जवळ) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी महिला निर्मला कैलास वर्मा हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटकही केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे नातेवाईक आहेत. फिर्यादीची पत्नी आणि आरोपी या दोघी बहिणी आहेत. हे सर्वजण मार्केट यार्ड परिसरातील एका बांधकाम साईटवर काम करतात. तिथेच लेबर कॅम्पमध्ये राहण्यासाठी आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आरोपी महिलेला फिर्यादीच्या पत्नीचे म्हणजेच सख्ख्या बहिणीचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

याच संशयातून तिने फिर्यादी यांचा तीन वर्षीय मुलगा चाकेन वर्मा हा बांधकाम साईटच्या मागच्या बाजूला खेळत असताना त्याला उचलून घेऊन गेली. बांधकाम साईटच्या ग्राउंड फ्लोरच्या लिफ्टजवळ असणाऱ्या खड्ड्यातील पाण्यात त्या मुलाला फेकून दिले. यामध्ये बुडाल्याने त्या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल. परंतु पोलिसांच्या चौकशी आरोपींनी त्याला पाण्यात फेकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.