Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. वाहन चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मंगळवारी (दि. 18) चाकण, आळंदी, पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत राहुल गुलाब नाणेकर (वय 25, रा. नाणेकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाणेकर यांनी त्यांची 12 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए वाय 6331 ही दुचाकी सोमवारी (दि. 17) दुपारी बारा वाजता नाणेकरवाडी येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुपारी दोन वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत मल्हारी बळवंत मोहिते (वय 68, रा. मोहितेवाडी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिते यांनी त्यांची 12 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ ए 2724 ही दुचाकी शनिवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजता आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेच्या गेटच्या आत पार्क केली. गाडीची चावी डिकीच्या लॉकला विसरली. त्या चवीच्या साहाय्याने अज्ञात चोरटयांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार अवघ्या दीड तासाने उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत कमलेश शामलाल केवलानी (वय 45, रा. साई चौक, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केलवानी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 14 / जी आर 9235 ही दुचाकी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता गोकुळ हॉटेल जवळ पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार तीन वाजता उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या घटनेत राजेंद्र श्रीराम औंगड (वय 47, रा. श्रीधरनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी औंगड यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ डब्ल्यू 0972 ही दुचाकी 4 फेब्रुवारी रोजी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. चोरट्यांनी सकाळी नऊ ते पावणे अकरा या कालावधीत ही दुचाकी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

पाचव्या घटनेत सुखदेव रामचंद्र झंजाड (वय 50, रा. दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झंजाड यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 12 / एच क्यू 0621 ही दुचाकी 14 फेब्रुवारीत रोजी दुपारी डीड वाजता भोसरी ब्रिजखाली पार्क केली. चोरटयांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रात्री दहा वाजता उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

सहाव्या घटनेत सुनील केशव होळकर (वय 33, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होळकर यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी पी 9207 ही दुचाकी सोमवारी (दि. 17) रात्री आठ वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.