Pimpri : शहरात वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी (दि. 15) एकाच दिवशी हिंजवडीत दोन, एमआयडीसी भोसरी, निगडी, पिंपरी आणि आळंदी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे.

विलास सदाशिव गव्हाणे (वय 48, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. गव्हाणे यांची एम एच 14 / डी क्‍यू 5245 ही 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी 29 जानेवारी 2020 रोजी राहत्या घराजवळून चोरीस गेली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

ओंकार सुरेंद्र बागडे (वय 26, रा. एलआयजी कॉलनी, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 15 फेब्रुवारी रोजी बागडे यांची 20 हजार रुपये किंमतीची एम एच 14 / डी आर 6010 ही दुचाकी ढेकणे हॉस्पिटल समोरून चोरट्यांनी चोरून नेली. पोलीस हवालदार रेंगडे तपास करीत आहेत.

सुदर्शन कृष्णा सोनुने (वय 27, रा. खिरीड वस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सोनुने यांची 40 हजार रुपये किंमतीची एम एच 14 / जी ई 8658 ही दुचाकी 10 फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी राहत्या घरासमोरून चोरून नेली. पोलीस नाईक ढवळे तपास करीत आहेत.

हिमानी संजीवकुमार बालीयान (वय 23, रा. सनशाईन, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिमानी यांनी आपली 20 हजार रुपये किंमतीची जी जे 06 / एच क्‍यू 2361 ही दुचाकी विजय सेल्स दुकानाच्या बाजूच्या कच्च्या रस्त्यावर 14 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. पोलीस नाईक घरबुडे तपास करीत आहेत.

अविराज सुदाम खोसे (वय 27, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. खोसे यांची 28 हजार रुपये किंमतीची एम एच 14 / डी आर 1831 ही दुचाकी 14 फेब्रुवारी रोजी चोरून नेली. पोलीस नाईक आयवळे तपास करीत आहेत.

भानुदास प्रकसह ठाकूर (वय 20, रा. सोळू, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. ठाकूर यांनी आपली 31 हजार रुपये किमतीची एम एच 14 / जी क्यू 9063 ही बुलेट गावात पार्क केली होती. चोरटयांनी त्याची बुलेट चोरून नेली. पोलीस नाईक क्षीरसागर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.