Maharashtra Corona Update : राज्यात सहा कोटी चाचण्या पूर्ण, आज 2,486 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) 2 हजार 486 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 हजार 446 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सहा कोटी कोरोना चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 57 हजार 326 नमूने तपासण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 65 लाख 75 हजार 578 एवढी झाली आहे. त्यापैकी 63 लाख 99 हजार 464 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.32 टक्के एवढा झाला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 2,486
*⃣Recoveries – 2,446
*⃣Deaths – 44
*⃣Active Cases – 33,006
*⃣Total Cases till date – 65,75,578
*⃣Total Recoveries till date – 63,99,464
*⃣Total Deaths till date – 1,39,514
*⃣Tests till date – 6,00,57,326(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) October 9, 2021
राज्यात आज घडीला 33 हजार 6 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 44 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 514 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात 1 हजार 023 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2 लाख 41 हजार 499 जण होम क्वारंटाईन आहेत.