Hinjawadi : सहा लाखांचे बांधकाम साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीचे बांधकाम साहित्य साईटवरील एका फ्लॅटमधून चोरून नेल्याची घटना बुचडे वस्ती, मारुंजी येथे मंगळवारी (दि. 18) सकाळी नऊच्या दरम्यान उघडकीस आली. चोरट्यांनी सहा लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.

संदीप राजाराम मोरे (वय 40, रा. ठाकरे नगर, कर्वेनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुचडे वस्ती, मारुंजी (ता. मुळशी) येथे एक बांधकाम साईट आहे. तेथील एका फ्लॅटमध्ये फिर्यादी मोरे यांच्या कंपनीचे बांधकाम साहित्य ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्यांनी एकूण सहा लाख सात हजार 591 रुपयांचे साहित्य चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.