Bhosari: खूशखबर! सहा जण कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Six person recovered from coronavirus in bhosari, discharged from hospital

एमपीसी न्यूज- चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टीतील रुग्ण बरे होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या भोसरीतील रुग्णालयात उपचार घेऊन तीन आणि वायसीएममधून तीन असे सहा रुग्ण गुरुवारी (दि. 28) कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ढगे, डॉ. अल्वी, नर्स वाजे, कापरे, पुंडे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कोरोनावर कोणतेही ठोस औषध नसताना रुग बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे. दररोज रुग्ण बरे होत आहेत. आजपर्यंत शहरातील 197 जण बरे होऊन घरी गेले आहेत. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील सात जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत 227 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत बाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. पण, ज्या प्रमाणात रुग्ण वाढताहेत. त्या प्रमाणात कमी सुद्धा होताहेत. कोरोनाविरुद्ध लढण्याऱ्या डॉक्टर, नर्स, सेवक, पोलीस, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या लढ्याला यशही येत आहे.

शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनावर मात करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.