Pimpri Crime News : व्यावसायिक आनंद उनावणे खुनाच्या तपासासाठी पोलिसांची सहा पथके

एमपीसी न्यूज – पिंपरीतील व्यवसायिक आनंद उनावणे यांचे अपहरण करून महाडमध्ये खून करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरीतील चीटफंडचा व्यवसाय करणारे आनंद उनावणे (वय 45, रा. नर्मदा, म्हाडा वसाहत, मोरवाडी, पिंपरी) यांचे 4 फेब्रुवारी रोजी अपरहण करण्यात आले होते. महाडमध्ये त्यांचा मृतदेह शनिवारी (दि. 6) आढळून आला. या गुन्ह्याच्या तपासाकरिता पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करीत आहे.

दरम्यान आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली आहे. या आरोपींचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. आरोपींना अटक केल्यानंतरच हा खून व्यवसायिक की कौटूंबिक कारणावरून झाला याचा उलगडा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1