Chikhali News : शहर परिसरात एकाच दिवशी चोरीचे सहा गुन्हे दाखल,  पाच लाखांचा ऐवज चोरीला  

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शनिवारी (दि.24) चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या. त्यामध्ये पाच लाख सहा हजार 606 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.(Chikhali News) वाकड, निगडी, तळेगाव दाभाडे, रावेत, चिखली या पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल असून यामध्ये दुचाकी चोरी, दागिन्यांची चोरी यांचा समावेश आहे.

गोविंद भरत सुरवसे (वय 38, रा. मारुंजी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरवसे यांचे विशालनगर पिंपळे निलख येथे दुकान आहे. शनिवारी पहाटे अज्ञातांनी त्यांचे दुकान फोडून दुकानातून दोन लाख 28 हजार 306 रुपयांची मोटार वाइंडिंग ची कॉपर वायर चोरून नेली.

राहुल रमेश सावंत (वय 30, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सावंत हे शुक्रवारी सकाळी घराला कुलूप लावून कंपनीत कामाला गेले असता (Chikhali News) दिवसभरात अज्ञातांनी दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, सॅकबॅग, लेडीज पर्स, कागदपत्रे आणि इतर साहित्य असा एकूण 53 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Dehu gaon : इंद्रायणी नदीतील अवैधरित्या वाळू उपसा प्रकरणी दोघांना अटक , ट्रॅक्टर व पोकलेन जप्त

निगडी पोलीस ठाण्यात 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी महिला शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर थांबल्या असताना त्यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि मिनीगंठण असे एक लाख 20 हजारांचे दागिने अज्ञातांनी चोरून नेले.

अनुप श्यामकार्तिक चौरसिया (वय 25, रा. रहाटणी) यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञातांनी रावेत येथून चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामभवन रामसजीवन निशाद (वय 35, रा. चिखली) यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी सकाळी अकरा वाजता कुदळवाडी येथील अपना वजन काट्यासमोर पार्क केली.(Chikhali News) अर्ध्या तासात निशाद यांची दुचाकी चोरीला गेली. शिवाजी बन्सी मोरे (वय 62, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञातांनी त्यांच्या घराच्या पार्किंग मधून रात्रीच्या वेळी चोरून नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.