Crime News : न-हे येथे मध्यराञी इमारतीच्या पार्किंगमधे सहा वाहनांना आग

एमपीसी न्यूज –  न-हे येथील हरिहरेश्वर पार्क, बी विंग, माताजी नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाकडे येताच नवले अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. घटनासथळी पोहोचताच इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याचे पाहताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवत धोका दूर केला.

तत्पुर्वी अग्नीशमन दलाची मदत पोहचण्याआधी स्थानिकांनी बादली व नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाकडून वेळोवेळी शहरात राबविण्यात येणारी अग्निशमन सुरक्षाविषयक प्रात्यक्षिक व संवाद यामुळे नागरिकांमध्ये आग व त्याच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आगीमधे 4 दुचाकी व 2 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.तसेच पार्किंगच्या वरील सिलिंगच्या काही भागाला आगीची झळ लागल्याचे दिसून आले. सदर इमारत ही तळमजला अधिक सहा मजले अशी असून आगीचे कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्राचे अधिकारी प्रकाश गोरे, वाहनचालक पांगारे तसेच जवान भरत गोगावले, शिंदे व मदतनीस नलवडे, मछिंद्र यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.