Nigdi News : निगडी प्राधिकरण येथे घरफोडीत 60 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथे चोरट्यांनी घरफोडी (Nigdi News) करत 60 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

वामन नरहरी शेळके (वय 67 , रा. सेक्टर क्रमांक 26, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : एटीएमची अदलाबदल करत 49 हजार लुबाडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञाताने घरफोडी केली. घरातील लोखंडी व लाकडी कपाटात ठेवलेले 1.8 ग्रॅम वजनाचे (Nigdi News) सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.