SJPL Sonigara Jewellers: 50 वर्षांहून जुनी सर्वोत्कृष्ट सुवर्णपेढी म्हणून SJPLचा गौरव

एमपीसी न्यूज – विश्वसनीय आणि प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड SJPL सोनिगरा ज्वेलर्सने (SJPL Sonigara Jewellers) पुणे सराफ असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या 97 व्या पुरस्कार सोहळ्यात ‘50 वर्षे आणि त्याहून अधिक काळ जुनी सर्वोत्कृष्ट सुवर्णपेढी – ‘ओल्ड फर्म डेव्हलप्ड विथ इनोव्हेशन’चा पुरस्कार प्राप्त केला.

नुकत्याच झालेल्या पुणे सराफ असोसिएशन पुरस्कार सोहळ्यात ज्वेलरी उद्योगाचा सन्मान करण्यासाठी पुण्यातील हजारांहून अधिक ज्वेलरी शोरूमचे मालक तसेच सुंदर, कलात्मक अलंकार घडविणारी अफाट प्रतिभावंत व्यक्तिमत्वे बिबवेवाडीच्या यश लॉन्स येथे एकत्र आली होती.

या पुरस्कार सोहळ्यात सात श्रेणींचा समावेश होता – पुणे सराफ असोसिएशन भूषण, 50 वर्षे व त्यावरील सर्वोत्कृष्ट सुवर्णपेढी – ‘ओल्ड फर्म डेव्हलप्ड विथ इनोव्हेशन’ (Old Firm Developed with Innovation), सर्वोत्कृष्ट ज्वेलरी डिझायनर- महिला, सर्वोत्कृष्ट ज्वेलरी डिझायनर – पुरुष, सर्वोत्कृष्ट सराफ महिला उद्योजक, सर्वोत्कृष्ट सराफ पुरुष उद्योजक आणि सर्वोत्कृष्ट निर्माता.

SJPL Sonigara Jewellers सह दहा सुवर्णपेढ्यांना नामांकन

10 ज्वेलरी स्टोअर्सना ‘50 वर्षे आणि त्याहून अधिक काळातील सर्वोत्कृष्ट सुवर्णपेढी ‘डेव्हलप्ड विथ इनोव्हेशन’ पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. या 10 नामांकित व्यक्तींमध्ये, SJPL चे मानद भागीदार किरणराज के. सोनिगरा, रमेश के. सोनिगारा, अमृत के. सोनिगरा, राहुल आर. सोनिगरा, सुनील एम. सोनिगरा यांनी संयुक्तपणे पुरस्कार स्वीकारला.

पुणे सराफ असोसिएशनचे विश्वस्त फत्तेचंद एन रांका यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार मधुराणी गोखले यांच्यासह मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री रूपाली भोसलेही उपस्थित होत्या.

SJPL Sonigara Jewellers
एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स या विश्वासार्ह व प्रतिष्ठीत ब्रँडमागील नेतृत्व किरणराज सोनिगरा व रमेश सोनिगरा

“गेल्या 72 वर्षांमध्ये, SJPL सोनिगारा ज्वेलर्सने क्रांतीकारी उत्पादने आणि ऑफरसह दहा लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. 50 वर्षे आणि त्याहून अधिक काळातील सर्वोत्कृष्ट सुवर्णपेढी – ओल्ड फर्म डेव्हलप्ड विथ इनोव्हेशन’ हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला. इतर नामांकित व्यक्तींमध्ये ही एक खडतर स्पर्धा होती. परंतु 1950 पासूनच्या आमच्या कठोर परिश्रमामुळे आम्हाला हा पुरस्कार जिंकता आला”, असे किरणराज के. सोनिगरा यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

SJPL Sonigara Jewellers
एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सची तिसरी पिढीतील युवा नेतृत्व राहुल सोनिगरा व सुनील सोनिगरा हे ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

रमेश. के. सोनिगारा म्हणाले की, “आमची पुढची पिढी नवीन तंत्रज्ञानासह व्यवसाय अपग्रेड करण्यात, नवीन आव्हाने स्वीकारण्यात आणि ग्राहकांच्या समाधानासाठी त्याची अंमलबजावणी करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ज्वेलरी शोरूमची चेन उघडणे, हे आमचे भविष्यातील ध्येय आहे.”

River Development Project: काय आहे पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प?

पुणे सराफ असोसिएशनला 97 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सोहळा पार पडला. असोसिएशन आपल्या अस्तित्वाची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत पुढील 3 वर्षे सातत्याने असेच पुरस्कार सोहळे आयोजित करणार आहे. पुरस्कार सोहळ्यात ज्वेलरी उद्योगातील नवीन पिढ्यांचेही कौतुक करण्यात आले.

SJPL सोनिगरा ज्वेलर्स

SJPL सोनिगरा ज्वेलर्स (SJPL Sonigara Jewellers) हे दिवंगत केसरीमल किसनलाल सोनिगारा यांचे प्रत्यक्षात साकारलेले स्वप्न आहे. केसरीमलजी हे स्थापनेपासूनच ब्रँडसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत. सोनिगरा ज्वेलर्सने 1950 मध्ये देहूरोड येथे पहिले दुकान सुरू केले. त्यानंतर 1980 मध्ये चिंचवडमध्ये तर 2010 मध्ये हडपसर शोरूमचे उद्घाटन झाले. 2017 मध्ये सांगवी आणि भोसरी येथे दोन नवीन शाखा उघडण्यात आल्या.

धनराज के. सोनिगरा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, किरण के. सोनिगरा, रमेश के. सोनिगरा, मदन के. सोनिगरा आणि अमृत के. सोनिगरा हा ब्रँड नवीन उंची गाठण्यासाठी वचनबद्ध आहे. नव्या पिढीचे नेतृत्व राहुल आर. सोनिगरा आणि सुनील एम. सोनिगरा करणार आहेत. त्यांनी नवी ऊर्जा आणि नव्या कल्पनांनी ब्रँडला चालना दिली आहे. SJPL सोनिगरा ज्वेलर्स हे तिसऱ्या पिढीतही विश्वासार्ह व परिवारातील नाव आहे.

SJPL Sonigara Jewellers
Chinchwad address :- 201, Opposite Jayshree Theatre, Chinchwad Station, Old Mumbai-Pune Highway, MIDC, Chinchwad, Pimpri- Chinchwad, Maharashtra- 411019

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.