Chinchwad: स्कोडा फोक्सवॅगनकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांना 500 पीपीई किट व 5000 फेसमास्कचे वाटप

skoda Volkswagen distributes 500 PPE kits and 5000 face masks to Pimpri-Chinchwad police

एमपीसी न्यूज- स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि कंपनीकडून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 500 पीपीई किट व 5000 फेसमास्कचे वाटप करण्यात आले.

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या रक्षणासाठी 24 तास कडा पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि कंपनीने एक पाऊल पुढे टाकत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 500 पीपीई किट व 5000 फेसमास्कचे वाटप करण्यात आले आहे.


याप्रसंगी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.