Pimpri News : झोपडपट्ट्यांमध्ये सोलर पॅनेलद्वारे मिळणार वीज

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील शांतीनगर, विठ्ठलनगर आणि दत्तनगर या तीन झोपडपट्ट्यांमधील घरांना सोलर पॅनेलद्वारे वीजपुरवठा केल जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणा-या या प्रकल्पासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरींग कन्सलन्टंट इंडिया लिमिटेड किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संस्थेला थेट पद्धतीने कंत्राट देण्यात येणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत घोषित – अघोषित झोपडपट्टी आहेत. या झोपडपट्टीतील रहिवाशांचे आरोग्यमान आणि जीवनमान उत्तम राहणे ही महापालिकेची पालक म्हणून प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे शहरातील झोपडपट्टीवासियांना घरामध्ये सोलर पॅनेलद्वारे वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलर होम लाईटद्वारे पर्यावरणदृष्ट्या वीज प्रवाह होणार असल्याने विजेचा वापर कमी होईल.

_MPC_DIR_MPU_II

तसेच राज्य विज महावितरण मार्फत तयार होणा-या रा प्रदुषण वायू पासून म्हणजेच कार्बन (सीओ2) नायट्रो ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड या प्रदूषण वायूंपासून रहिवाशांचा बचाव होईल. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर शांतीनगर, विठ्ठलनगर आणि दत्तनगर या झोपडपट्टीमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात घराच्या छपरावर सोलर पॅनल उभारुन त्याद्वारे सोलर फोटो व्होल्टाइक पॅनल द्वारे वीजनिर्मिती केली जाते. निर्माण झालेली वीज थेट महावितरण जाळयातून भारनियमन बंदला जोडली जाऊ शकते. प्रत्येक झोपडपट्टीतील कुटूंबाना याचा फायदा होईल. शिवाय विजेचे मासिक बील अत्यंत कमी प्रमाणात येईल. ट्युब लाईट, दोन सोलर, होम लाईट सेट म्हणजे एक एक फॅन चालविण्यासाठी सोलर पॅनल तसेच बॅटरी बॅक अप इनव्हर्टर आणि एक खांब कार्यान्वित करुन देण्यात येणार आहे.

हे काम करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरींग कन्सलन्टंट इंडिया लिमिटेड अथवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संस्थेस थेट पध्दतीने कंत्राट देण्यात येणार आहे. ही खरेदी महापालिकेच्या शहर सुधारणा विभागामार्फत झोपडपट्टी निमुर्लन आणि पुर्नवसन स्थापत्य विभागाकडून करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शहर सुधारणा विभागातील अखर्चित रक्कम या विषयावर वेळोवेळी निधी उपलब्ध केला जाणार आहे.

महापालिका शहर सुधारणा समितीच्या 16 फेब्रुवारी रोजीच्या सभेत हा ठराव मंजुर करण्यात आला होता. स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावाला आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.