Bhosari News : प्रस्तावित वीजदरवाढी विरोधात लघुउद्योजक आक्रमक, महावितरण कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज  – महावितरणने चालू वर्षाकरिता 37 टक्के व पुढील वर्षापासून 41 टक्के वीज दर वाढ करण्यास परवानगी मिळावी याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केलेली असून या याचिकेला विरोध करण्याकरिता पिंपरी-चिंचवड (Bhosari News) लघुउद्योग संघटनेतर्फे आज (शुक्रवारी) भोसरीतील महावितरण कार्यालयावर  मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर वीजबिलाची होळी करण्यात आली.

या मोर्चा व ठिय्या आंदोलनात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संस्थापक व माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, उपाध्यक्ष  संजय जगताप, सचिव जयंत कड, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक तसेच स्विकृत संचालक- माणिक पडवळ, सुनील शिंदे, सचिन पाटील, अशोक पाटील,  सचिन रोडे, श्रीपती खुणे, विकास नाईकरे, रमेश होले, संजय भोसले, सल्लागार- चांगदेव कोलते, राजू देशपांडे,अनिल कांकरिया, तसेच संघटनेचे अनेक उद्योजक सभासद उपस्थित होते.

 

Asia Cup – आशिया कप दरम्यान भारत पाकिस्तानशी न्यूट्रल ठिकाणी खेळू शकतो – पीसीबी

संघटनेचे सचिव जयंत कड यांनी प्रास्ताविक केले  संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ व संजय भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शेवटी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी संघटनेच्या पदाधिकारी, संचालक व सभासद उद्योजकांना मार्गदर्शन केले.

महावितरणने 40 टक्के वीज गळती व चोरी होणारी वीज नियंत्रणात आणली तर वीज दरवाढ करण्याची गरजच भासणार नाही. महाराष्ट्र शासनाने पुढील चार वर्षाची  प्रस्तावित वीजदर वाढीची रक्कम 65 हजार कोटी रुपये हे टप्प्या टप्प्याने महावितरणला सबसिडीरुपात द्यावेत जेणे करून वीजदरवाढ होणार नाही (Bhosari News) व याचा फायदा हा लघुउद्योजकांना, व्यापाऱ्यांना व घरगुती वीज ग्राहकांना होईल. वीजदर वाढ रद्द न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व संघटनांना एकत्र करून विधान भवनावर लघुउद्योजकांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल.  पुढील नियोजन काय असेल याची माहिती उद्योजकांना अध्यक्षांनी दिली. यानंतर संघटनेच्या वतीने प्रस्तावित वीजदरवाढ विरोधातील निवेदन कार्यकारी अभियंता भोसले  यांना देण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.