BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : ‘कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’ निगडीत; इंटीरियर डिजाइनवर दोन कोटींचा खर्च 

सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे शहरावर नजर

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे ‘कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’ महापालिकेच्या निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलातील अस्तित्व मॉल येथे सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरद्वारे संपूर्ण शहरावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍याद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. मॉलमधील इंटीरियर डिजाइन, फर्निचरचे काम करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली.

स्मार्ट सिटीच्या ‘पॅन सिटी’ अंतर्गत हे सेंटर राबविण्यात येत आहे. कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर (सिटी ऑपरेशन सेंटर) निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलात असणार आहे. त्याद्वारे 25 लाख लोकसंख्येच्या शहरावर 24 तास लक्ष ठेवले जाणार आहे.  त्यामुळे एखादी दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदत पोहोचविणे शक्य होणार आहे. या सेंटरचे नियंत्रण 50 टक्के पिंपरी-चिंचवड महापालिका आणि 50 टक्के पोलीस आयुक्तालयाकडे असणार आहे.

कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर सुरु करण्यासाठी मॉलमधील इंटीरियर डिजाइन केले जाणार आहे. फर्निचरची कामे केली जाणार आहेत. हे काम चैतन्य एंटरप्राईजेस या ठेकेदाराकडून दोन कोटी सात लाख रुपयांमध्ये करून घेण्यात येणार आहे.  ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

HB_POST_END_FTR-A2

.