Smart City : संचालक मंडळाची बैठक, विकास प्रकल्पांचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी (Smart City) लिमिटेडच्या संचालक मंडळाची 20 वी बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.26) पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सल्लागार यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचे भौतिक व आर्थिक प्रगतीबाबत सादरीकरण केले.

महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  शेखर सिंह, नामनिर्देशक संचालक (GOI) ममता बत्रा, स्वतंत्र संचालक यशवंत भावे,  प्रदीपकुमार भार्गव, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी  सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह अधिकारी तसेच सल्लागार प्रतिनिधी उपस्थ‍ित होते.

या बैठकीमध्ये विविध विषयांवर संचालक मंडळाने (Smart City) चर्चा केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांचा सर्विस्तर आढावा घेतला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या कालमर्यादेबाबत संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले. तसेच, मे. टेक महिंद्रा आणि मे. एल अँड टी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष चर्चा करून प्रकल्प अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या. सन 2021-22 या आथिर्क वर्षाचा ताळेबंद मंजूर करून वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मंजूरीसाठी शिफारस करण्यात आली. तसेच, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 30  सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Alandi : नवरात्रनिमित्त पद्मावती मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

या बैठकीमध्ये प्रकल्प सल्लागार यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचे भौतिक व आर्थिक प्रगतीबाबत सादरीकरण केले. त्यावर संचालक मंडळाद्वारे चर्चा होवून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात आले. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.