Smart city : स्मार्ट सिटीच्या जनरल मॅनेजरपदी सहशहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी (Smart city) लिमिटेडच्या जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) पदी सह शहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये रुजू झालेले सह शहर अभियंता अशोक भालकर यांना स्मार्ट सिटी लिमिटेडकडील जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर या पदावर नियुक्ती देण्यात आलेली होती. अशोक भालकर  यांची पदोन्नतीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , पुणे येथे बदली झाल्याने जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर हे पद रिक्त झाले होते.

Mahavitaran : पुण्यात महावितरणच्या दोन दिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन

रिक्त जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर पदी सह शहर अभियंता (स्थापत्य) मनोज सेठिया यांची नियुक्ती (Smart city) करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडील कामकाज सोपविण्यात आलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.