Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दुस-या महिला पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील

एमपीसी न्यूज – नव्याने सूरू होत असलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त पदावर स्मार्तना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 27) काढलेल्या आदेशानुसार नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्तना पाटील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दुस-या महिला पोलीस आयुक्त म्हणून ओळखल्या जाणार आहेत.

स्मार्तना पाटील यापूर्वी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली. नम्रता पाटील यापूर्वी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) पदावर कार्यरत होत्या. तर विनायक ढाकणे पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर येथे कार्यरत होते. आयुक्तालयाची अति वरिष्ठ, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वेगाने नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट रोजी आयुक्तालय सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनीही पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला असून आयुक्तालयाबाबत अधिका-यांच्या महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.