Bhosari: पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी जाणा-या महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 75 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि.18) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरी, एमआयडीसी येथे घडली.

याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील चांदगुडे बंगल्यासमोरून जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.