Bhandara Dongar Crime News : तुकोबारायांच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज : भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी मैत्रिणीसोबत गेलेल्या एका तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका अनोळखी चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

जान्हवी सुरेश नादरे (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी फिर्यादी नादरे आणि त्यांची मैत्रिणी अक्षदा दीपक शहाणे या दोघी सुदवडी गावाजवळ असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या.

दर्शन घेऊन डोंगराच्या पहिल्या वळणाच्या रस्त्याच्या कडेला दोघी कट्ट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी एका अनोळखी चोरट्याने नादरे यांच्या गळ्यातून तीन ग्रॅम वजनाची 11 हजार 500 रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.