Talegaon News : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री पावणे नऊ वाजता यशवंतनगर तळेगाव दाभाडे येथे घडली.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी (दि. 16) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास यशवंतनगर पोस्ट ऑफिस पासून पायी चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या समोरून एका मोपेड दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 40 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.